
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.
कातुर्ली हे ग्रामपंचायत पंचायत समिती आमगाव जि.गोंदिया येथील ग्राम पंचायत असून २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या २६१८ एवढी आहे.

लोकसंख्या

जि.प.शाळा

वृक्षांची संख्या
| ग्रामपंचायतीचे नाव | कातुर्ली |
| लोकसंख्या | 2618 |
| सरपंचाचे नाव | श्री.छगनलाल खेतराम बावनकर |
| ग्रामसेवकाचे नाव | कु.एस.आर.भस्मे |
| ग्राम पंचायत सदस्य संख्या | 10 |
| कुटुंब संख्या | 812 |
| दारिद्र रेषेखालील कुटुंब संख्या | 307 |
| इमारतीची संख्या | 838 |
| शौचालयांची संख्या | 812 |
| शाळेतील शौचालय संख्या | 03 |
| अंगणवाडी शौचालय संख्या | 03 |
| गावातील कर्मचारी संख्या | 20 |
| सार्वजनिक विहीर संख्या | 16 |
| विंधन विहीर/बोरवेल संख्या | 22 |

ग्राम पंचायतच्या वतीने नागरिकांना अर्थसहाय्य, जीवनमान सुधारणा आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. ज्यापैकी काही महत्वाच्या योजना.

ग्राम पंचायत कातुर्ली येथे अनेक सामाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये नागरिकांचा सहभागाने गावाचा विकास साधण्यास मदत मिळते.

आम्ही ग्राम पंचायत म्हणून कार्य करताना शासनाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली. त्याचे श्रेय गावातील एकी आणि संघटीत राहण्याच्या त्यांचा वृत्तीला जातो.
ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

श्री.छगनलाल खेतराम बावनकर
सरपंच

कु.एस.आर.भस्मे
ग्रामपंचायत अधिकारी

श्री.गौरीशंकर मनिराम पाथोडे
उपसरपंच

श्री.दिपक खेतराम भेलावे
सदस्य
शिक्षण,आरोग्य, पर्यावरण, महिला सशक्तीकरण यासह महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहेत. जसे नाला सरळीकरण, सिंचन विहीर, घर, गोठे, फळबाग, वृक्षारोपण, जलसंधारण, तलाव खोलीकरण, रस्ते, सौंदर्यीकरण ई. कामातून वर्षभर मजुरांच्या हाताला काम, कामानुसार दाम आणि विविध उपक्रमातून, विकास कामातून गावाची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू आहे. यात गावातून मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग, लोकवर्गणीचे बळ सातत्याने मिळणे हे सुखद आणि गाव विकासास पोषक ठरत आहे.
श्री.छगनलाल खेतराम बावनकर - सरपंच
कृषी कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण, ठिबक सिंचन व सौरपंप वापर, जैविक शेती, पीक विमा, रोहयोतून सिंचन विहिरी, जनावरांसाठी गोठे, फळबाग, गोबरगॅस वापर, अशा शेती विषयक विविध योजनांवर जनजागृती करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे जे, शेतकरी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय आरोग्य,शिक्षण, पाणी, रोहयोतून रोजगानिर्मिती अशा चौफेर बाजूने गावाचा विकास घडविण्याचा प्रयत्न गावाला नवी दिशा देणारा आहे.
डॉ. जयवंतराव बावनकर - ज्येष्ठ शेतकरी
ग्रामपंचायत कातुर्ली अंतर्गत एकूण चार अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या चारही अंगणवाडी केंद्रांची आकर्षक बोलकी पेंटिंग ग्राम पंचायती केलेली असल्याने चिमुकल्यांना हे केंद्र अतिशय आकर्षित करत असून अंगणवाडीच्या जणू भिंतीही बोलू लागल्याची प्रचिती येत आहे. ईतर सुविधा देखील तेवढ्याच जबाबदारीने ग्रामपंचायत पुरवत असून उन्नत गावाचे नागरिक आणि कर्मचारी असल्याचा अभिमान आहे.
एस. टी. भालाधरे सर - मुख्याध्यापिका जि.प.प्राथ. शाळा
आरोग्य सेवेकडे बारीक लक्ष पर्यावरण, शिक्षण, पाणी, स्वच्छतेबरोबरच आरोग्याच्या सेवेकडे ग्रामपंचायतीचे बारीक लक्ष असते. पाण्याचे नमुने, आरोग्य तपासणी, रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर, शुद्ध पाण्याची उपलब्धता या बरोबरच आरोग्य उपकेंद्रातील भौतिक सुविधा यावर सतत लक्ष असते. याचीच फलश्रुती म्हणजे आरोग्य उपकेंद्राला सुंदर माझा दवाखाना आणि कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेत.
डॉ. दिनेश कटरे - समुदाय आरोग्य अधिकारी
